यंदाचा विनोद दोशी नाट्यमहोत्सवाला 27 फेब्रवारीपासून सुरूवात

एमपीसी न्यूज – पुणेकर वर्षानुवर्षे विनोद दोशी नाट्यमहोत्सवाचा आनंद घेत आहेत. यंदा हा महोत्सव 27 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

परिषदेत विनोद आणि सरयू दोशी फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. सरयू दोशी, महोत्सवाचे संचालक अशोक कुलकर्णी, नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, चित्रपट व रंगमंच अभिनेता आणि दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी, नाटककार आणि अभिनेत्री इरावती कर्णिक आणि नाट्य दिग्दर्शक मोहित टाकळकर उपस्थित होते. हा महोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदादेखील पुणे शहरात होणार आहे.

 पुण्यात गेली 8 वर्षांपासून अनेक प्रतिभावंत कलाकारांचे काम या रंगमंचावर काम प्रस्तुत झाले आहे. तरुणाईचा सहभाग वाढवण्यासाठी प्रायोगिक नाटकाचा देखील समावेश करण्यात आला आहे. यंदा अतुल पेठे, अभिषेक मुजूमदार, नील चौधरी, सुरजित नोंगमैकपम आणि शरण्या रामप्रकाश यांची नाटके पहावयास मिळणार आहेत. मागील काही वर्षात विजय तेंडूलकर, मोहन राकेश, इस्मत चुगताई, सई परांजप्ये, नसरूद्दिन शाह, रत्ना पाठक शाह, रघूबीर यादव या दिग्गज कलाकारांचे काम या महोत्सवामध्ये सादर झाले आहे. या वर्षी नवी दिल्ली, पुणे, बंगळुरू आणि इंफाळ येथील कलाकार हिंदी, इंग्रजी, मराठी व कानडी भाषेत नाटक सादर करणार आहेत.

यावेळी डॉ. दोशी म्हणाले की, वर्षानुवर्षे या व्यासपीठाने अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांना अनुभवले आहे. हे 5 दिवस पुणेकरांसाठी नक्कीच पर्वणी ठरतील याची खात्री आहे. या महोत्सवामध्ये अनेक समकालीन व हृयाला स्पर्श करणा-या कलाकृती पहावयास मिळणार आहेत.

महोत्सवाचे संचालक अशोक कुलकर्णी म्हणाले की, या वर्षी भारतातील विविध भागातील कलाकार वेगवेगळ्या भाषेत त्यांचे प्रयोग सादर करणार आहेत. विभिन्न भाषांमध्ये प्रयोग पाहताना पुणेकरांना नक्कीच आनंद होईल. महोत्सवामध्ये भारतातील सर्वोत्कृष्ठ नाट्यकृती पाहून प्रेक्षक दाद देतील हे नक्की.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.