Chakan News : खेड मध्ये नवीन 27 रुग्ण, 4 मृत्यू, 13 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात शुक्रवारी (दि. 27 ऑगस्ट) 13 गावे आणि 2 पालिकांमध्ये 27 रुग्ण मिळून आले आहेत.  तर 4 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

निघोजे येथील 48 वर्षीय पुरुषाचा ,पिंपळगाव येथील 43 वर्षीय पुरुषाचा, चिंचोशी येथील 78 वर्षीय पुरुषाचा आणि कनेरसर येथील 34 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34 हजार 281 झाला आहे. यापैकी 33 हजार 501 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 264 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 4 मृत्यूने 516 एवढा झाला आहे. सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 23 रुग्ण, चाकण 3, आळंदी 0, राजगुरुनगर 1 असे एकुण 27 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-आसखेड खु. ,चऱ्होली खु. ,धामणे , काळूस , केळगाव , कुरुळी , वाळद , शेलपिंपळगाव या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे.  शिरोली , मरकळ, रासे या गावांमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण मिळाले आहेत.  वाकी बु. व बहुळ येथे प्रत्येकी 4 रुग्ण रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.