Cricketer Commits Suicide: संधी मिळत नसल्यामुळे मुंबईच्या 27 वर्षीय क्रिकेटपटूने केली आत्महत्या

27-year-old Mumbai cricketer found dead at home करणसोबत त्याची आई आणि भाऊ राहत होता. त्याच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार संधी मिळत नसल्याने करण गेल्या काही दिवसांपासून निराश होता.

एमपीसी न्यूज – क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील एका क्लब क्रिकेटरने सोमवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. करण तिवारी असे या क्रिकेटपटूचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, सोमवारी करण तिवारी याच्या बेडरूमचा दरवाजा जेव्हा त्याच्या कुटुंबीयानी उघडला तेव्हा करणने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. रात्री साडेदहा वाजता गोकुळधाम कोनू कपाउंडमध्ये करणने आत्महत्या केली. पोलिसांना करणच्या बेडरुममधून सुसाइट नोट सापडली आहे.

करणसोबत त्याची आई आणि भाऊ राहत होता. त्याच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार संधी मिळत नसल्याने करण गेल्या काही दिवसांपासून निराश होता. करणने आत्महत्या करण्याआधी राजस्थानमधील एका मित्राला फोन केला होता. आपल्याला संधी मिळत नसल्याबद्दल निराश असल्याचे त्याला सांगितले होते. तसेच मी आयुष्य संपवण्याचा विचार करत असल्याचे करणने मित्राला सांगितले होते.

स्थानिक क्रिकेटमध्ये करणला ज्युनिअर डेल स्टेन असे म्हटले जात होते. करणची गोलंदाजी करण्याची अ‍ॅक्शन आणि उंची दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन सारखी होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.