Pune Railway News : फेब्रुवारी महिन्यात पकडले 27 हजार फुकटे प्रवासी ; दीड कोटींचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे विभागात फेब्रुवारी महिन्यात 27 हजार 364 फुकटे प्रवासी पकडले. त्यांच्याकडून एक कोटी 58 लाख 98 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वे विभागाच्या वतीने पुणे विभागात विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांना पकडण्याची मोहीम राबवली जात आहे. फेब्रुवारी 2022 या महिन्यात पुणे रेल्वे विभागात 27 हजार 364 प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडले. या फुकट्या प्रवाशांकडून एक कोटी 58 लाख 98 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

त्याचबरोबर 42 लोकांना अनियमित प्रवास करताना पकडले असून त्यांच्याकडून 17 हजार रुपये दंड आकारला आहे. बुक न करता सामान नेल्याबाबत 112 लोकांकडून 14 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या 11 महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट, अनियमित प्रवास करणा-या 1 लाख 86 हजार 927 प्रवाशांकडून दंड स्वरूपात 8 कोटी 97 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.