Pimpri: औद्योगिकनगरीत आज 276 नवीन रुग्णांची भर, 79 जणांना डिस्चार्ज, सात जणांचा मृत्यू

276 persons today tested positive to coronavirus in Pimpri Chinchwad while 7 covid19 patients died. आज शहराच्या विविध भागातील 232 आणि शहराबाहेरील 44 अशा 276  जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. शहराच्या विविध भागातील 232 आणि शहराबाहेरील 44 अशा 276 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, आज एकाचदिवशी सात जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्णसंख्या 3776 वर जाऊन पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी घट्ट होताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून 200 हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज शहराच्या विविध भागातील 232 आणि शहराबाहेरील 44 अशा 276  जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 79 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

तर, शहरातील मोहननगर चिंचवड येथील 62 वर्षीय महिला, भीमनगर पिंपरीतील 60 वर्षीय महिला, चिंचवडेनगर येथील 65 वर्षीय पुरुष, रिव्हररोड पिंपरीतील 67 वर्षीय पुरुष, निगडीतील 80 वर्षीय वृद्ध, साईनगर मामुर्डीतील 66 वर्षीय आणि महापालिका हद्दीबाहेरील शितळानगर देहूरोड येथील 58 वर्षीय पुरुष अशा सात जणांचा आज एकाचदिवशी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 3776 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 2233 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 53 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 32 अशा 85 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1482  सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल!
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 981
# पॉझिटीव्ह रुग्ण – 276
#निगेटीव्ह रुग्ण – 242
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 2159
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 2266
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 847
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 3776
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 1482
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  85
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 2233
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 25952
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 84521

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.