India Corona Update : चोवीस तासांत 2,796 मृत्यू, 8,895 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 8 हजार 895 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 6 हजार 918 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 796 मृत्यूंची नोंद झाली आहे. बिहारने 2 हजार 426 आणि केरळमध्ये 263 पाठीमागे झालेल्या मृत्यूची नोंद आता केल्याने ही वाढ झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. 

देशाचा रिकव्हरी रेट 98.35 टक्के

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 46 लाख 33 हजार 255 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 40 लाख 60 हजार 774 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 98.35 टक्के एवढा झाला आहे.

देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के

देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक लाखाच्या खाली आली असून. सध्या 99 हजार 155 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजवर 4 लाख 73 हजार 326 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारी नुसार देशात आजवर 64 कोटी 72 लाख 52 हजार 850 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी गेल्या 24 तासांत 12 लाख 26 हजार 064 नमूने तपासण्यात आले आहेत.

 

देशात आत्तापर्यंत 127.61 कोटी नागरिकांना लस
कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 127.61 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 1 कोटींहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.