Pune : तरुणीकडून 24 लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त, सीमाशुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – पुण्यात एका तरुणीकडून 24.4 लाख रुपये किमतीचे 54 ग्राम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. सीमाशुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.  

पुण्यातील एनआयबीएम परिसरात ही तरुणी मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या महिलेला अटक केली. या महिलेवर गुन्हा दाखल करून कोर्टात हजर केले असता तिची रवानगी न्यायालयात करण्यात आली. यासोबत तिच्याकडून 416 एलएसडी स्टॅम्प जप्त करण्यात आले. पुणे विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात एलएसडी स्टॅम्प जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दुसऱ्या एका घटनेत डेव्हिड फ्रान्सिस या नायजेरियन नागरिकाडून पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ओ हॉटेल जवळून 4 लाख 16 हजाराचे कोकेन जप्त करण्यात आले. त्याच्यावरही गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.