Pimpri: शहरात 2816 ‘ॲक्टीव्ह’ रुग्ण; 69 जणांची प्रकृती गंभीर

2816 active patients in city, 69 critical patients.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 7229 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4306 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 2816 सक्रिय रुग्णांवर महापालिका, विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामध्ये 2050 बाधितांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. 423 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून 69 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, 107 जणांचा कोरोनाने आजपर्यंत बळी घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 10 मार्च रोजी सापडला होता.

राज्यातील पहिला रुग्ण शहरात सापडल्याने राज्याचे शहराकडे लक्ष लागले होते. मार्च, एप्रिल आणि अर्धा मे महिना शहरातील परिस्थितीती नियंत्रणात होती.

परंतु, शहराला 22 मे रोजी रेडझोनमधून वगळण्यात आले. त्यानंतर शहरातील रुग्ण संख्येत प्रचंड झपाट्याने वाढ होत आहे.

शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

झोपडपट्टी, गावठाण भागातील रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. तीन हजार रग्ण केवळ झोपडपट्टीतीलच आहेत.

मागील काही दिवसांपासून तर रुग्णवाढीचा उच्चांक होत आहे. दररोज कमालीची रुग्णवाढ होत आहे. जुलैअखेरपर्यंत शहरातील रुग्णसंख्या दहा हजारांचा टप्पा ओलांडेल असा आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा कयास आहे.

शहरातील  कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी घट्ट होताना दिसून येत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवार (दि.13) मध्यरात्रीपासून शहरात दहा दिवसांकरिता लॉकडाउन असणार आहे. लॉकडाउनमध्ये कोरोनाची साखळी तुटते का, रुग्णसंख्या आटोक्यात येते का, हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

10 मार्चपासून शहरातील 7229 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4306 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.  तर, 2816 सक्रिय रुग्णांवर महापालिका, विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

त्यापैकी  2050 बाधितांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. 423 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून 69 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, 107 जणांचा कोरोनाने आजपर्यंत बळी घेतला आहे.

पॉझिटीव्ह पण कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत असे 2050 रुग्ण आहेत. त्याचे प्रमाण 80 टक्के आहे. पण, यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

कारण, हे रुग्ण कोरोना ‘वाहक’ होऊ शकतात. पण, प्रशासनाकडून  त्याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

तर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सुरुवातीच्या काळात लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. तर, गंभीर रुग्णांची संख्या कमी होती.

आता त्यामध्ये वाढ होत आहे. 423 रुग्णांमध्ये लक्षणे आहेत. तर, 69 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.