Chakan News : खेड मध्ये 29 रुग्ण ; 42 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात मंगळवारी (दि. 3 ) 14 गावे आणि 3 पालिकांमध्ये 29 रुग्ण मिळून आले आहेत. सोमवारी निच्चांकी पातळीवर गेलेली रुग्ण संख्या आणखी घटेल अशी अपेक्षा असताना रुग्ण संखेत मात्र वाढ झाली आहे. 

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 515 झाला आहे. यापैकी 32 हजार 785 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. मंगळवारी दिवसभरात 42 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 249 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 481 एवढा आहे.

मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 29 रुग्ण, चाकण 1, आळंदी 1, राजगुरुनगर 1 असे एकुण 29 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
बहुळ,चऱ्होली खु. ,चिंबळी , गोसासी, काळेचीवाडी ,काळूस ,खराबवाडी, मोई, शिंदे , वासुली, येलवाडी या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे. औदर मध्ये 2 रुग्ण ,  शेलपिंपळगाव मध्ये 3 रुग्ण ; तर चिंचोशी मध्ये 10 रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.