India Corona Update : मागील चोवीस तासांत 29,398 नवे कोरोना रुग्ण, 414 मृत्यू 

एमपीसी न्यूज – भारतात मागील चोवीस तासांत 29 हजार 398 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 414 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 98 लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. 

केंद्रीय आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 97 लाख 96 हजार 770 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत देशभरात 37 हजार 528 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून देशातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 92 लाख 90 हजार 834 एवढी झाली आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.83 टक्के एवढं झाले आहे.

 

देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या निरंतर कमी होत असून सध्या 3 लाख 63 हजार 749 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशभरात 414 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात 1 लाख 42 हजार 186 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.45 टक्के एवढा आहे.

आयसीएआरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरात 15 कोटींहून अधिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. दररोज 9 ते 10 लाखांच्या जवळपास नमूने तपासले जात आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे प्रमाण घटले असून सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट सध्या 93.52 टक्के एवढा आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.