Chakan Crime News : बंधा-याला लावायचे पाऊणे पाच लाखांचे 299 लोखंडी दरवाजे चोरीला, तिघेजण अटकेत

एमपीसी न्यूज – बहुळगावच्या हद्दीतील बंधा-याला लावायचे तब्बल पाऊणे पाच लाखांचे 299 लोखंडी दरवाजे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना ताब्यात घेतले आहे. 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान हा प्रकार घडला.

याप्रकरणी भामा आसखेड पाटबंधारे विभागाचे नारायण अबु ढवळे (वय 58, रा. सांगवीसे, टाकवे, मावळ ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिवशंकर नागआप्पा शेखापुरे (वय 29, रा. मिलींदनगर, निगडी) गोलु कुमार शिवनंदन दास (वय 25, रा. धावडेवस्ती, भोसरी) व शेरू सुरेंद्र विश्वकर्मा (वय 27, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. दरम्यान, विनायक विकास टाकळकर, अजिम कलिम सय्यद आणि रोहन बंडु पडवळ (तिघेही रा. धावडेवस्ती भोसरी) हे आरोपी फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बहुळगावच्या हद्दीतील बंधा-याला लावायचे पाऊणे पाच लाखांचे 299 लोखंडी दरवाजे चोरुन नेले. त्यातील 40 दरवाजे आरोपी यांच्या जवळ सापडले त्यांना ताब्यात घेतले असून, इतर तीन आरोपी पळून गेले आहेत. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.