Balewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न

एमपीसी न्यूज- दिव्यांग नागरिकांमध्ये नेमबाजी खेळाची जनजागृती प्रसार प्रचार आवड निर्माण होवून आपल्या शहराचे राज्याचे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी पुणे महानगर पालिका व पॅरा टार्गेट शुटिंग असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२२ या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रिडा संकूल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे पार पडली.

या स्पर्धेत एकूण ९२ दिव्यांग खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती त्यातील ७८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार व क्रिडा उपायुक्त संतोष वारूळे यांनी स्पर्धेसाठी मोलाची मदत केली बक्षीस समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून क्रिडा मंत्री श्री गरीष महाजन, आमदार महेश लांडगे, उपायुक्त रंजना गगे, समाज विकास अधिकारी भावना मोहोळ, टोकियो पॅरा ऑलिंपिक खेळाडू स्वरूप उन्हाळकर राष्ट्रीय खेळाडू रूग्वेदा डोळस, फिजिओथेरपिस्ट डॉ सायली पवार, अभय पवार अध्यक्ष रफिक खान, संतोष गाढे शिवछत्रपती पुरस्कार विजेते अनिल पवार उपस्थित होते.
क्रिडा मंत्री गरीष महाजन यांनी शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडूंना नोकरीसाठी लवकरच योग्य निर्णय घेवू तसेच दिव्यांग खेळाडूंना राज्य सरकार भरघोस मदत करेल अशी ग्वाही दिली तसेच नेमबाजी चा आनंद घेतला. स्पर्धेच्या उद्दघाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार विजेते जयप्रकाश नोटीयाल भारतीय पॅरा नेमबाजी संघाचे प्रशिक्षक सुभाष राणा भारतीय पॅरा नेमबाजी संघाचे फिजिओथेरपिस्ट डॉ पवन रोहिल्ला, समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण उपस्थित होते आकाश कुंभार यांनी स्पर्धाप्रमुख म्हणून काम पाहिले.

पुरुष गटात प्रथम क्रमांक शरद डुबुकवाड यांना मिळाला असून त्यांना ३५८ गुण मिळाले होते. व्दितीय क्रमांक  अक्षय नलावडे यांना मिळाला असून त्यांना
 ३३७ गुण मिळाले होते. तृतीय क्रमांक दिनेश मालविययांना मिळाला असून त्यांना ३२० गुण मिळाले होते.
महिला गटात प्रथम क्रमांक मनिषा थोपटे यांना मिळाला असून त्यांना ३२७ गुण मिळाले होते. व्दितीय क्रमांक भाग्यश्री मोरे यांना मिळाला असून त्यांना ३१२ गुण मिळाले होते. तृतीय क्रमांक सुरेखा हिरवे यांना मिळाला असून त्यांना २९४ गुण मिळाले होते.
SH2 मिक्स गटात प्रथम क्रमांक राघव बारावकर यांना मिळाला असून त्यांना गुण ३३७ गुण मिळाले होते. व्दितीय क्रमांक विनायक राजपूत यांना मिळाला असून त्यांना गुण ३३१ तृतीय क्रमांक सचिन करंबेळे यांना मिळाला असून त्यांना गुण २६५ गुण मिळाले होते.
प्रत्येक प्रथम क्रमांक विजेत्यास सुवर्ण पदक, प्रमाणपत्र व ५५०० रूपये बक्षीस देण्यात आले. प्रत्येक व्दितीय क्रमांकास रौप्य पदक प्रमाणपत्र व ३५०० रूपये बक्षीस देण्यात आले. प्रत्येक तृतीय क्रमांकास कांस्य पदक प्रमाणपत्र व २२०० रूपयांचे बक्षीस देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.