Pune : दुकानाचे शटर अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांकडून 3.5 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – येरवडा येथे दुकानाचे शटर अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एका 65 वर्षीय महिलेने (रा. अशोकनगर येरवडा) याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचे येरवडा येथे साई जनरल स्टोअर्स दुकानाचे शटर नजर चुकीने अर्धवट बंद करून जेवणासाठी घरी जाऊन जेवण करून झोपल्या होत्या. याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी दुकानातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 250 रुपये असा एकूण तीन लाख 55 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. येरवडा पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.