Pune : भरदिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – भरदिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना युनिट चारच्या पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. त्यांच्याकडून 5 लाख15 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

मोहम्मद रिजवान अजमत अली (वय 26) , दीपक उर्फ अजय सुभाष(वय, 27)  व उजेंद्र छत्रपालसिंह (वय 38,  तिघेही राहता उत्तर पश्चिम, नवी दिल्ली), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी निखिल सुरेश ताडीलकर (वडगावशेरी, पुणे) यांनी तक्रार दिली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भर दिवसा निखिल यांच्या घराच्या दरवाजाचे लावलेले कुलूप तोडून 190 ग्रॅम सोने व 5 हजार 500 एवढी रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार निखिल यांनी दिली होती. दरम्यान, या गुन्ह्याचा तापस करत असताना आरोपी दिल्ली येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट चारच्या पोलिसांनी या तिघांना दिल्ली, तिहार जेल व प्रतापगढ( उत्तर प्रदेश) येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडून 17 तोळे 4 ग्रॅम एवढ्या वजनाचे म्हणजेच 5 लाख 15 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. आरोपींना न्यालायसमोर हजर केले असता त्यांना 17ऑगस्ट 2018 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

ही कामगिरी युनिट 4 चे पोलीस उप आयुक्त प्रसाद अक्कानवरू, गणेश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेन्द्र मुळीक, विठ्ठल दरेकर, गायकवाड, भोसले व कर्मचारी पोलीस हवालदार अजित धुमाळ, तुषार भिवरकर, सुभाष आव्हाड, तुषार खराडे, दत्ता शिंदे, सचिन कोळी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.