India Corona Update : देशात गेल्या 24 तासात 3 लाख 14 हजार नवीन रुग्ण

एकट्या महाराष्ट्रातील 22 टक्के रुग्ण

एमपीसी न्यूज – भारतात मागील 24 तासात तब्बल तीन लाख 14 हजार 835 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील 24 तासात 67 हजार 468 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील रुग्णवाढीच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा 22 टक्के एवढा आहे.

भारतात प्रथमच एका दिवसात तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले. त्यात धक्कादायक बाब ही की, भारतातील एका दिवसातील ही वाढ जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. अमेरिकेत झालेल्या रुग्णवाढीला देखील भारताने मागे टाकले आहे. 2 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेत तीन लाख 310 नवीन रुग्ण एकाच दिवसात सापडले होते. आतापर्यंत ही संख्या सर्वाधिक होती. मात्र भारतात एका दिवसात तीन लाख 14 हजार 835 रुग्ण एका दिवसात सापडल्याने भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे.

कोरोनाने भारतात रौद्ररूप धारण केले आहे. बेड, ऑक्सिजन, इतर वैद्यकीय पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात कमी पडत आहेत. भारतातील कोरोना रुग्णसंख्या एक कोटी 59 लाख 30 हजार 965 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत एक कोटी 34 लाख 54 हजार 880 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

मागील 24 तासात भारतात दोन हजार 104 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आजवर मृत्यू झालेला आकडा एक लाख 84 हजार 657 एवढा झाला आहे.

देशात सध्या 22 लाख 91 हजार 428 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशभरात 13 कोटी 23 लाख 30 हजार 644 जणांचं लसीकरण झालं आहे.

ANI Twitter link –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.