दामदुपटीच्या बहाण्याने दाम्पत्याची तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – गुंतवणूक केल्यास दुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखवून एका व्यक्तीने दांपत्यास तीन लाखांचा गंडा घातला आहे. हा प्रकार 17 जानेवारी 2022 रोजी जुनी सांगवी येथे घडला. दिलेल्या मुदतीत दुप्पट पैसे तसेच गुंतवलेली रक्कम देखील न दिल्याने दहा महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुंतवणूक केल्यास दुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखवून एका व्यक्तीने दांपत्यास तीन लाखांचा गंडा घातला आहे.

Wadaki Fire : वडकी येथे चप्पल व बूटचे गोडाऊन जळून खाक

प्रशांत भिकाजी साळुंके (वय 50, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 11) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9775904380 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला व्हाट्सअप कॉल करून पैसे गुंतविण्याची ऑफर दिली. पैसे गुंतवल्यास ठराविक दिवसांमध्ये पैसे दुप्पट देण्याचे आमिष दाखवून आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीकडून वेळोवेळी तीन लाख रुपये घेतले. अमिश दाखवल्या प्रमाणे दुप्पट रक्कम अथवा गुंतवलेले तीन लाख रुपये परत न करता आरोपीने फसवणूक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.