Talegaon Dabhade News : कोविड सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 लाखाचा विमा

एमपीसी न्यूज : साजित शेख यांच्या  जन्मदिना निमित्त कोरोना काळात युद्धपातळीवर काम केलेल्या डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉय, सिक्युरिटी यांचा 3 लक्ष रुपये पर्यंत मोफत विमा काढून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे भविष्यात वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर त्या सर्वांना 3लाख रुपयाचा विमा संरक्षण काढुन देणार असल्याचे यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी घोषणा केली.

यावेळी पुणे जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष संतोष कुंभार, डॉ.गुणेश बागुडे, डॉ.पदमवीर थोरात, मावळ भाजपा प्रसिद्धीप्रमुख अनंता कुडे,नगरसेविका शोभाताई भेगडे,नगरसेवक अरुण भेगडे, गटनेते अमोल शेटे,माजी नगरसेवक अयुबभाई शिकिलकर,जमीर नालबंद, उद्योजक बंटी भेगडे, केदार भेगडे,प्रतीक भेगडे,सोहेल शिकीलकर,सर्फराज नालबंद, मन्सूर शहा,अतुल शिंदे,इरफान नालबंद,राहील मणियार,साजिद शेख मित्र परिवार आदीजन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंता कुडे व प्रास्ताविक व आभार केदार भेगडे यांनी मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.