Indian Army  : भारताच्या वायुसेनेत आणखी ३ राफेल लढाऊ विमाने दाखल 

एमपीसी न्यूज  : भारताच्या वायुसेनेत  ३ राफेल लढाऊ विमाने दाखल झाल्याची माहिती भारतीय वायुसेनेने दिली आहे. फ्रान्सहून ३ राफेल लढाऊ विमाने संध्याकाळी ८.१४ मिनिटांनी भारतात पोहोचले आहेत. फ्रान्समधील इस्ट्रेस येथून भारतातील गुजरातमधील जामनगर येथे ही विमाने दाखल झाली आहेत.ही या विमाने दाखल व्हायची दुसरी बॅच आहे. यापूर्वी पाच विमाने भारतात दाखल झाली आहेत.

 

भारताच्या वायुसेनेत आज ३ राफेल लढाऊ विमाने दाखल झाल्याची माहिती भारतीय वायुसेनेने दिली आहे. फ्रान्सहून ३ राफेल लढाऊ विमाने संध्याकाळी ८.१४ मिनिटांनी भारतात पोहोचले आहेत. फ्रान्समधील इस्ट्रेस येथून भारतातील गुजरातमधील जामनगर येथे ही विमाने दाखल झाली आहेत. ही या विमाने दाखल व्हायची दुसरी बॅच आहे. यापूर्वी पाच विमाने भारतात दाखल झाली आहेत.

फ्रान्सहून निघालेल्या या विमानांच्या सोबत फ्रान्स एअर फोर्सचं मिड एअर रिफ्युलिंग एअरक्राफ्ट सुद्धा सोबत होतं. भारतात तीन राफेल विमाने दाखल झाल्यामुळे आता भारतीय वायुसेनेकडे एकूण आठ राफेल विमाने झाली आहेत. यापूर्वी २९ जुलै रोजी पाच राफेल लढाऊ विमानांची बॅच भारतात दाखल झाली होती. ही विमाने १० सप्टेंबर रोजी अंबाला येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘गोल्डन एरोज स्क्वॉड्रन’मध्ये सहभागी झाली होती.

-एप्रिलपर्यंत २१ राफेल विमाने येणार
भारत सरकारने फ्रान्समधील दसॉल्ट कंपनीसोबत ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. या करारानुसार राफेल विमाने भारतात यापूर्वीच येणं अपेक्षित होतं मात्र, कोरोना संकटामुळे विमाने मिळण्यास उशीर झाला. फ्रान्समधून भारताला एप्रिल २०२१ या काळात २१ राफेल मिळणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.