Ravet news: एका भरधाव कारने दोन कार व दोन दुचाकींना धडक दिल्याने 3 जण जखमी

एमपीसी न्यूज : एका भरधाव कारने दोन कार व दोन दुचाकींना धडक दिल्याने 3 जण जखमी झाल्याची घटना आज गुरुवार 1 डिसेंबर रोजी रावेत येथे घडली आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

या अपघातात कार चालक अमित खन्ना, रा. रावेत, मोटरसायकल चालक महेश शिवारे, रा. स्पाईन रोड भोसरी व अरुण कुमार हे तीन जण जखमी झाले आहेत. शिवारे व कुमार यांना पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वाय.सी.एम) मध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

Nagnath Kottapalle: पिंपरी चिंचवड शहराचे भूषण थोर साहित्यिक ‘डॉ. नागनाथ कोत्तापल्ले’

याबाबत प्राथमिक माहिती देताना, शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रावेत पोलीस ठाणे म्हणाले की, हा अपघात एस बी पाटील कॉलेज ते बी.आर.टी रोड वर रावेत येथे झाला आहे. एका भरदाव वेगात चालणाऱ्या स्विफ्ट डिजायर कार स्पीड ब्रेकर वरून उडून दोन दुचाकी वाहनांना धडकली. यानंतर ती कार एका दुकानासमोरील 2 कारला धडकली व उलटली.

स्विफ्ट कार चालक अमित खन्ना हा जखमी झाला आहे. दुचाकी चालक महेश शिवारे याने दुचाकी स्टार्ट केली तेव्हा त्याला धडक बसून तो जखमी झाला आहे. अरुण कुमार हा देखील या अपघातात जखमी झाला आहे. शिवारे व कुमार यांच्यावर उपचार चालू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.