Panshet Dam News : पानशेत धरणाच्या सांडव्यावरून 3 हजार 908 क्यूसेक्स झाला विसर्ग 

एमपीसी न्यूज – पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा 2 हजार 931 क्यूसेक विसर्ग वाढवून संध्याकाळी 7 वाजता 3 हजार 908 क्यूसेक करण्यात आला आहे, असे खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता यो.स.भंडलकर यांनी सांगितले आहे.

 

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.

 

पानशेत धरण हे आंबी नदीवर बांधण्यात आले आहे.आंबी नदी ही मुठा नदीची उपनदी आहे. या दोन्ही नद्यांच्या काठावर लोकांनी सतर्क रहावे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.