Pune : खाऊचं आमिष दाखवून 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्युज – खाऊचं आमिष दाखवून 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्का दायक घटना समोर आली आहे.
ही घटना पाषाण सोमेश्वरवाडी येथील एका वृद्धाश्रमाच्या मागील झुडपात शनिवारी(दि.22) सायंकाळी साडेपाच च्या दरम्यान घडली.

यातील नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. शंभुकुमार दुखी राय (वय 21, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडीत मुलीच्या आईने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी शंभुकुमार हे एकाच लेबर कॅम्पमध्ये राहतात. शनिवारी सायंकाळी शंभुकुमारने या महिलेच्या तीन वर्षाच्या मुलीला कुरकुरे देण्याचे आमिष दाखवले व तिला वृद्धाश्रमाच्या मागील झुडपात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

चिमुरडीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. चतु:श्रृंगी पोलिसांनी घटनेनंतर तासाभरातच राय आला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी मंजूर केली आहे़.

याप्रकरणी पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.