लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उपनिबंधकाला 30 हजाराची लाच स्वीकारताना अटक

एमपीसी न्यूज – लाचलुचप प्रतिबंधक विभागाकडून पुण्यातील गुलटेकडी येथील उपनिबंधक सहकारी संस्थेच्या तृतीय श्रेणीतील अधिकारी तथा उपनिबंधकाला 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

संभाजीराव काशिनाथ पांढरे (वय-52, रा. सहकारनगर,पर्वती पुणे), असे अटक करण्यात आलेल्या उपनिबंधकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पांढरे यांनी तक्रारदाराकडून सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी अनुकूल अहवाल पाठवून प्रकरण जिल्हा उपनिबंधक कार्यालय पुणे यांच्याकडे पाठवण्यासाठी 30 हजाराची लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी पांढरे याला सापळा रचून 30 हजाराची लाच स्वीकारताना अटक करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.