BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम 30 टक्के पूर्ण

एमपीसी न्यूज – वाढणारी वाहनांची संख्या, त्यामुळे होणारे प्रदूषण आणि प्रवासासाठी लागणार वेळ या सर्वांना पर्याय म्हणून मेट्रोकडे पाहिले जात आहे. मेट्रोच्या वतीने शहरात मार्गिका क्रमांक एकचे काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये पिंपरी-चिंचवड करांना मेट्रोतून सुरक्षित आणि जलद प्रवास करता येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे 30 टक्के काम पूर्ण झाले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुरु असलेले महा मेट्रोचे काम आता आकर्षणाचा विषय झाला आहे. या कामाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो पिलरचे फाउंडेशन पासून ते मेट्रो स्थानकांपर्यंत सर्व पातळीवरील कामे जोरात सुरु आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका ते रेंज हिल हा 11.54 किलोमीटरचा मार्ग आहे. या मार्गावर एकूण नऊ मेट्रो स्टेशन आहेत. औद्योगिक क्षेत्र, संरक्षण, शासकीय कार्यालये आणि महाविद्यालयांमुळे शहरात वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गर्दीवर मात करण्यासाठी आगामी काळात मेट्रो सर्वांना फायदेशीर ठरणार आहे. प्रशासन आणि मेट्रो यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे. तसेच नागरिकांचा देखील मेट्रोच्या कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

मेट्रोचे पिंपरी-चिंचवड महापालिका ते रेंज हिल दरम्यान झालेले काम –

# पाईल 457
# फाऊंडेशन 203
# पियर 168
# पियर कॅप 84
# स्टेशन पियर आर्म काँक्रिट 02
# सेगमेंट कास्टिंग 900
# स्टेशन गर्डर कास्टिंग 33
# सेगमेंट लॉंचिंग 33

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3