Pimpri News : जॅकवेलच्या कामात 30 कोटींचा भ्रष्टाचार, निविदा रद्द करा; राष्ट्रवादीचा आयुक्त दालनासमोर ठिय्या

एमपीसी न्यूज – भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलच्या कामात तब्बल 30 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत (Pimpri News) राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पाणीपुरवठा विभागाच्या सह शहर अभियंत्यांना घेराव घालत ही निविदा त्वरीत रद्द करण्याच्या मागणी करण्यात आली.

”चाटून खा, फुसून खा, भाजपने सोडला सदाचार, पाण्यातही केला भ्रष्टाचार”, ”जनता के सन्मान में, राष्ट्रवादी मैदान मे”, ”प्रशासन हटवा- पिंपरी-चिंचवड वाचवा” अशा विविध घोषणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलकांनी महापालिका भवन दणाणून सोडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी) महापालिकेत झालेल्या या आंदोलनात युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, राहुल भोसले, विक्रांत लांडे, प्रविण भालेकर, प्रशांत शितोळे, शाम लांडे, विनोद नढे, प्रवक्ते विनायक रणसुभे, फजल शेख, माजी नगरसेविका माया बारणे, वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune news: साताऱ्याकडून पुण्याकडे येणारी वाहतूक नवीन कात्रज बोगद्यातून दरीपूलमार्गे

शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलच्या कामाची मूळ निविदा 121 कोटी रुपयांची असताना, 151 कोटी रुपयांची निविदा सादर करणाऱ्या ठेकेदाराला हे काम देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे.(Pimpri News) राज्यातील सत्तेच्या जोरावर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून महापालिका प्रशासनाशी संगनमत करून महापालिकेची लूट सुरू आहे. आयुक्तांनी ही निविदा त्वरीत रद्द करावी, अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने महापालिकेला घेराव घालण्यात येईल.

पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांना आंदोलकांनी घेराव घालत निविदा रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. आयुक्त शेखर सिंह यांना लेखी निवेदन देऊन जॅकवेलच्या कामाची निविद रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.