Chakan News : खेड मध्ये नवे 30 कोरोना रुग्ण ; 4 मृत्यू तर 20 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात मंगळवारी (दि. 24 ) 16 गावे आणि 2 पालिकांमध्ये 30 रुग्ण मिळून आले आहेत.  तर 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कडूस येथील 55 वर्षीय महिलेचा , काळूस येथील 70 वर्षीय महिलेचा, साबुर्डी येथील 65 वर्षीय महिलेचा, आणि कनेरसर येथील 70 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, सदर हे सर्व मृत्यू मागील काही दिवसांत सी सी सी आवसरी रुग्णालय येथे झाले असून मंगळवारच्या अहवालात ते नमूद करण्यात आले आहेत.

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34 हजार 116 झाला आहे. यापैकी 33 हजार 466 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. मंगळवारी दिवसभरात 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 196 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 4 मृत्यूने 504 एवढा झाला आहे.  सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 27 रुग्ण, चाकण 1, आळंदी 0, राजगुरुनगर 2 असे एकुण 30 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे बहुळ, रोहकल,साबुर्डी , चिंबळी, गोलेगाव ,वरुडे, जैदवाडी , कडूस ,काळूस ,कनेरसर , कुरुळी या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे.

वेताळे व येलवाडी मध्ये प्रत्येकी 2 रुग्ण मिळाले आहेत.  नाणेकरवाडी व चऱ्होली खु.  मध्ये प्रत्येकी 3 रुग्ण, आणि शेलपिंपळगाव मध्ये 6 रुग्ण , असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.