महाराष्ट्र पोलीस दलाच्या ताफ्यात ‘महिंद्रा टीयुव्ही – 300’ ची 100 वाहने दाखल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र पोलीस दलामध्ये गतिमानता आणून जास्तीत जास्त जलद सेवा पुरविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये यावर्षी विविध प्रकारची अत्याधुनिक अशी 950 वाहने पोलीस दलात समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने  महिंद्रा ‘टीयुव्ही – 300 फोर प्लस’ ही 100 वाहने खरेदी करण्यात आली असून ती राज्याचे पोलीस महासंचालक सतिश माथूर यांच्या हस्ते आज पोलीस दलात समाविष्ट करण्यात आली आहेत.


पुणे शहरातील पोलीस मध्यवर्ती मोटार परिवहन कार्यशाळेच्या कवायत मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे  पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त सुनील रामानंद, याच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माथूर म्हणाले की, पोलीस दल हे समाजाच्या सेवेसाठी असून नागरिकांना जास्तीत जास्त मदत करणे आणि तत्परतेने सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यासाठीच राज्यसरकारने हे पाऊल उचलले असून त्यानुसारच ही वाहने पोलीस दलात दाखल झाली आहेत. पोलिसांनी या वाहनांचा वापर चांगल्या रितीने करून पोलीसदलाचा नाव लौकिक राखला जाईल अशीच वर्तणूक पोलीस कर्मचारी आणि अधिका-यांनी ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  

 
 
"suv"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.