Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीत पहिल्या दिवशी धावले 300 गाडे

एमपीसी न्यूज – चिखली, जाधववाडी बैलगाडा (bullock cart race) शर्यतीत पहिल्या दिवशी तब्बल 300 गाडे धावले आहेत. त्यापैकी 24 गाड्यांनी वरच्या फेरीत स्थान मिळवले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

बैलगाडा शर्यत टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर सुरू आहे. या शर्यतींचे संयोजन जय हनुमान बैलगाडा मंडळ, राहुलदादा जाधव बैलगाडा मंडळाने केले आहे. जय हनुमान बैलगाडा मंडळ व उत्सव समितीचे अध्यक्ष हनुमंत जाधव म्हणाले की, टोकन पद्धतीने शर्यतीचे नियोजन करण्यात आले. मात्र, 2 हजारहून अधिक टोकन बूक झाल्यामुळे शर्यत नियोजित चार दिवसांऐवजी पाच दिवस घ्यावी लागली. उद्या, 28 मे रोजी सकाळी माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन होईल.

PDFA Football League : निखिलच्या सुरेख प्रदर्शनाने जाएंटस ‘अ’ संघाचा विजय

सुमारे 12 हजार प्रेक्षकांची हजेरी…

स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन माजी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, पुणे जिल्ह्यातील भाजपाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, प्रसिद्घ गाडामालक उपस्थित होते. पहिल्या दिवशी एकूण 300 गाडे धावले असून, त्यापैकी 24 गाड्यांनी वरच्या फेरीमध्ये स्थान मिळवले आहे. पहिल्या दिवशी सुमारे 12 हजार प्रेक्षकांनी घाटावर बैलगाडा शर्यतींचा (bullock cart race) थरार अनुभवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.