Shikrapur Chakan : शिक्रापूर-चाकण रोडवरून 3 हजार किलो गोमांस जप्त, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – शिक्रापूर – चाकण (Shikrapur Chakan) रोडवर पोलिसांनी तब्बल 3 हजार किलो गोमांस जप्त केले असून दोघांना अटक केली आहे. हि कारवाई बुधवारी (दि.17) सकाळी चाकण पोलिसांनी केली आहे.

Chakan Police : महिलेकडे लग्नाचा  तगादा लावत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या वर गुन्हा

मोहिद रियाजत खान (वय 40 रा. घाटकोपर, मुंबई), व चालक अमिर अहमद रशिद अहमद शेख (वय 44 रा.कल्याण) अशी अटक आरोपीचे नाव असून याप्रकरणी टेम्पो मालक याकुब अहमद शेख ( रा. मिरारोड), इरफान शेख , ऱफिक भाई इद्रेसी ( रा. अहमदनगर) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे त्यांच्या ताब्यातील टेम्पो मधून बेकायदेशीर रित्या 5 लाख 40 हजार रुपयांच्या 3 हजार किलो गोमांस घेऊन जात होते. यावेली पोलिसांनी छापा टाकत आरोपींकडून गुन्ह्यात वापरेला 4 लाख 50 हजारांचा महिन्द्रा पिकअप (एमएच 04 एल ई. 1955) व गोमांस असा एकूण 9 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याचा पुढिल तपास चाकण (Shikrapur Chakan) पोलीस करत आहे.

Chakan Police : महिलेकडे लग्नाचा  तगादा लावत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या वर गुन्हा

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.