Vehicles in Municipal Parking : पालिकेच्या वाहनतळांमध्ये 300 बेवारस वाहने

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या (Vehicles in Municipal Parking) वतीने शहरातील विविध भागात उभारलेल्या वाहनतळांमध्ये जवळपास 300 वाहने बेवारसपणे धुळखात उभी आहे. कोरोनामुळे वाहनतळं बंद ठेवली होती. ती पुन्हा सुरू करण्यासाठी सुरू करण्यासाठी महापालिकेने स्वच्छता हाती घेतल्यानंतर ही वाहने उजेडात आली आहेत.

नागरिकांच्या सोयींसाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी 30 वाहनतळे उभारली आहेत. यामध्ये काही वाहनतळं बहुमजली तर काही वाहनतळ मोकळ्या जागेवर आहेत. ही वाहनतळे निविदा काढून खासगी ठेकेदारांना चालवण्यासाठी दिली जातात. मात्र, अनेक ठेकेदार वाहानचालकांकडून पैसे घेवूनही महापालिकेकडे भाडे जमा करत नाहीत. तसेच, अनेक ठेकेदार निविदेचा कालावधी संपूनही ताबा न सोडता वाहनतळे वापरतात.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रकल्प विभागाने सर्व वाहनतळे ताब्यात घेतले आहेत.

यातील सतीशशेठ मिसाळ वाहनतळ, हमालवाडा वाहनतळे चारचाकी आणि दुचाकी, आर्यन वाहनतळ आणि तुकारामशेठ शिंदे वाहनतळ (दुचाकी) ही वाहनतळे प्रशासनाकडून चालवण्यात येत आहेत. तर झोन क मधील स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालय वाहनतळ, कात्रज जुना जकातनाका वाहनतळ, कात्रज डेअरीजवळील वाहनतळ, पु. लं. देशपांडे उद्यानाजवळील वाहनतळ, कोंढवा बु. येथील इस्कॉन मंदिराजवळील वाहनतळ, सातारा रस्त्यावरील साईबाबा मंदिराजवळील वाहनतळ, बिबवेवाडी येथील डिसिजन टॉवर वाहनतळ, धनकवडी येथील ट्रकटर्मिनल वाहनतळ, पेशवे पार्क येथील वाहनतळ, शुक्रवार पेठेतील नवलोबा वाहनतळ ही दहा वाहनतळे एकाच ठेकेदाराने चालविण्यास घेतली आहेत. काही वाहनताळ बंद (Vehicles in Municipal Parking) ठेवण्यात आली आहेत, तर काही ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

Sarasbagh Chowpatty : पालिका सारसबाग चौपाटी येथे विकसित करणार वॉकींग प्लाझा

दरम्यान, या वाहनतळांमध्ये अनेक महिन्यांपासून काही वाहने धुळखात उभी आहेत. या वाहनांची संख्या 300 च्या घरात आहेत. ही वाहने कोणाची आहेत, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे या वाहनांचे काय करायचे, अशी विचारणा महापालिकेने आरटीओ व पोलिस प्रशासनाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, ही वाहने चोरीची असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.