स्वच्छ अॅपवर नागरिकांच्या तीन महिन्यात पिंपरी-चिंचवडसाठी 305 तक्रारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत नागरी सर्व्हेक्षण 2017 या स्पर्धेत भाग घेतला आहे. त्याअंतर्गत शहरासाठी स्वच्छ अॅपही तयार करण्यात आले  आहे. या अॅपवर  डिसेंबर ते  फेब्रुवारी या कालावधीत 305 तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत.

महापालिकेकडे अॅपद्वारे 305 तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी 303 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर दोन तक्रारी लवकरच निकाली काढण्यात येणार आहेत. यामध्ये कचरा न उचलणे, कचरा कुंडी न उचलणे अशा स्वरुपाच्या  तक्रारी होत्या, अशी माहिती आरोग्य अधिकारी यशवंत माने यांनी दिली.

स्वच्छ भारत अंतर्गत या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत नागरिक त्यांच्या परिसरातील कचरा किंवा अस्वच्छते संबंधी फोटोसह अॅपवर तक्रार करू शकतात. त्यानुसार नागरिकांनी आज अखेर 305 तक्रारी केल्या होत्या. त्यामध्ये कच-या संबंधित अधिक तक्रारी होत्या. संपूर्ण देशभरातून स्वच्छ भारत सर्व्हेक्षण अंतर्गत एकूण 500 शहरे समाविष्ठ झाली आहेत. 2016 साली पिंपरी-चिंचवडने देशात नववा तर राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता. त्यामुळे यावर्षी शहर प्रगती करते की क्रमवारीत घसरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.