India Corona Update : चोवीस तासांत 30,773 नवे कोरोना रुग्ण, 309 मृत्यू 

एमपीसी न्यूज – भारतात मागील 24 तासांत 30 हजार 773 नवे कोरोना रुग्ण सापडले असून, 309 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 3 लाख 32 हजार 158 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 34 लाख 48 हजार 163 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 26 लाख 71 हजार 167 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 38 हजार 945 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

मागील 24 तासांत देशभरात 309 कोरोना रुग्ण दगावले असून, भारतात आजवर 4 लाख 44 हजार 838 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा झाला आहे. रिकव्हरी रेट देखील वाढून 97.67 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 55 कोटी 23 लाख 40 हजार 168 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 15 लाख 59 हजार 895 नमूने तपासण्यात आले आहेत.

80 कोटी नागरिकांनी घेतली लस 

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 80 कोटी 43 लाख 72 हजार 331 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 85 लाख 42 हजार 732 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.