Pune : खडकवासला धरणातून 31449 क्युसेक पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणातून आज बुधवार (दि.४) सायंकाळी पाच वाजता ३१ हजार ४४९ क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. काल रात्री ११ वाजल्यापासून खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले.  

त्यात, रात्री ११ वाजता ७ हजार ७०४ क्यूसेक, पहाटे २ वाजता १३ हजार ९८१ क्यूसेक, पहाटे ४ वाजता १८ हजार ४९१ क्यूसेक, पहाटे ५ वाजता २२ हजार ८८० क्यूसेक, सकाळी ९ वाट २७ हजार २०३ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, खडकवासला धरण साखळीमध्ये अजूनही पावसाची संततधार सुरु असून, त्यामुळे सायंकाळी ५ वाजता खडकवासला धरणातून ३१ हजार ४४९ क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, काल रात्री साडेअकरा वाजता पुन्हा एकदा शिवणे नांदेड पूल आणि पहाटे साडेचार वाजता डेक्कन येथील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. तर अनेकांनी नदीपात्रात लावलेली वाहने पाण्यात बुडली. पावसात सातत्य राहिल्यास आणखीन पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.