Chinchwad News : मास्क न वापरणा-या 317 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी विनामास्क फिरणा-या नागरिकांवर कारवाईची मोहीम पुन्हा सुरु केली आहे. दररोज शेकडो नागरिकांवर कारवाई केली जात आहे. शनिवारी (दि. 15) 317 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी – चिंचवड शहरात पुन्हा करोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी दिवसभरात 317 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

शनिवारी पोलिसांनी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (36), भोसरी (15), चिंचवड (78), निगडी (49), दिघी (58), वाकड (67) आणि रावेत चौकी (14) अशी एकूण 317 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. उर्वरित 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाही कारवाईची नोंद नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.