Pimpri: रहाटणी व आकुर्डीत एटीएम फोडले; 32 लाखाची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात एकचदिवशी एटीएम फोडल्याचा दोन घटना घडल्या आहेत. रहाटणीतील एसबीआयच्या एटीएम मधून 21 लाख आणि आकुर्डी येथील दत्तवाडी परिसरातील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम  गॅस कटरच्या सहाय्याने फोडून 11 लाख  असे 32 लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. आठ तासात एटीएम फोडण्याच्या दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

रहाटणीतील एसबीआयच्या एटीएमचा दरवाजा उघडून चोरटे आतमध्ये घुसले. चोरट्यांनी एटीएम उचकटून  21 लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरट्यांनी पैसे घेऊन जाताना एटीएमचा दरवाजा बंद केला. दिवसभर एटीएम बंद असल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले नाही. सायंकाळी एटीएममध्ये पैसे कॅश व्हॅन आली. त्यावेळी एटीएममधून पैसे चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

आकुर्डी येथील दत्तवाडी परिसरातील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी भर दिवसा गॅस कटरच्या सहाय्याने फोडले. त्यातील तब्बल 11 लाख रुपये लंपास केले आहेत. ही घटना शनिवारी (दि.8) सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकुर्डी येथील दत्तनगर विठ्ठल मंदीर रोड परिसरातल बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने फोडले आहे. ही घटना शनिवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घडली मात्र चोरट्यांनी शटर पुन्हा बंद केले असल्यामुळे हा प्रकार लवकर उघडकीस आला नाही. मात्र ज्या कंत्राटदाराकडे या एटीएमचे देखभालीचे काम होते त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. या एटीएममध्ये कॅश असूनही दिवसभरात एकही ट्रॅन्जॅक्‍शन झाले नाही. त्यामुळे कंत्राटदाराला संशय आला. एटीएम मशीन नादुरुस्त झाली आहे का हे पाहण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या घटनेत 10 लाख 99 हजार 100 रुपये चोरीला गेले आहेत. निगडी पोलीस घटना स्थळावरील सीसीटव्ही फुटेज तपासत आहेत.घटनास्थळी निगडी पोलीस दाखल झाले असून  गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.