Pune Crime News : लग्नाच्या आमिषाने 32 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका 32 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल (Pune Crime News) करण्यात आला आहे. अभिजीत कल्याण आरणे (वय 33) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 2017 ते 2020 या कालावधीत हा प्रकार घडला. 

Pune Crime News : फुकट आंबे न दिल्याने मार्केटयार्डात व्यापार्‍याला ठार मारण्याचा प्रयत्न

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,  आरोपी हा फिर्यादी यांच्या ओळखीचा आहे. 2017 पासून ते एकमेकांना ओळखतात. दरम्यान आरोपीने फिर्यादीला लग्न करण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी महिलेला (Pune Crime News)  कात्रज येथील निसर्ग लॉज,  हॉलिडे लॉज त्या ठिकाणी घेऊन जातात त्यांच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. चार वर्षे हा प्रकार सुरू होता. दरम्यान आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.