Pimpri : उत्कर्ष शिंदे, पिल्ले, गोरखे, धर यांच्यासह 33 जणांनी नेले उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले प्रसिद्ध गायक डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज नेला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या तीन, भाजपचे तीन, शिवसेनेच्या एकाने अर्ज नेला असून एकूण 33 जणांनी 90 अर्ज नेले आहेत. आजपर्यंत पिंपरी मतदारसंघातून एकूण 52 जणांनी 121 अर्ज नेले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवार (दि. 27) पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत (दि.4) आहे. बुधवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने अर्ज भरण्यास केवळ तीनच दिवस शिल्लक आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्कर्ष शिंदे, नगरसेविका सुलक्षणा धर, राजू बनसोडे, शेखर ओव्हाळ यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर, भाजपच्या राजेश पिल्ले, अमित गोरखे, भीमा बोबडे, तेजस्विनी कदम यांनी देखील उमेदवारी अर्ज नेला आहे.  गोरखे यांनी अपक्ष देखील उमेदवारी अर्ज नेला आहे.

शिवसेना नगरसेवक सचिन भोसले यांनी देखील उमेदवारी अर्ज नेला आहे. काँग्रेसच्या सुंदर कांबळे यांनी देखील उमेदवारी अर्ज नेला असून शिवसेनेच्या जितेंद्र ननावरे यांनी अपक्ष अर्ज नेला आहे. एकूण 33 जणांनी 90 अर्ज नेले आहेत. आजपर्यंत पिंपरी मतदारसंघातून एकूण 52 जणांनी  121 अर्ज नेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.