Talegaon : सोन्याच्या बिस्कीटाचे अमिष दाखवून 33 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सोन्याची बिस्किटे देण्याचे अमिष दाखवून सहा जणांनी मिळून महिलेची फसवणूक केली. ही घटना 8 नोव्हेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.

पिंट्या उर्फ प्रकाश गोपाळ साळवे (वय 48), महेंद्र गोपाळ साळवे (वय 51), सिद्धार्थ महेंद्र साळवे (वय 22), आकाश प्रकाश साळवे (वय 22), तेजस प्रकाश साळवे, मीनाक्षी प्रकाश साळवे (सर्व रा. वीर चक्र चौक, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पिंट्या, महेंद्र, सिद्धार्थ, आकाश या चौघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका महिलेला सोन्याची बिस्किटे देण्याचे अमिष दाखवून तिच्याकडून 33 लाख रुपये घातले. महिलेने देखील आरोपींवर विश्वास ठेऊन दिले. मात्र काही दिवसानंतर देखील सोन्याची बिस्किटे दिली नाहीत. यावरून महिला दिलेले पैसे मागण्यासाठी आरोपींकडे गेली असता आरोपींनी तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला. यावरून महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता आरोपींना 22 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक केलेल्या आरोपींवर फसवणूक, मारामारी, आत्महत्येस प्रवृत्त करणे असे चार गुन्हे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात, निगडी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट प्रमाणे एक तर देहूरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा एक गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नारायण पवार, अजित दळवी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.