Pune News : दामदुप्पट च्या बहाण्याने वृद्धाची 33 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सहा महिन्यात दाम दुप्पट पैसे देण्याच्या बहाण्याने वृद्धाला पैसे गुंतवण्यास सांगत 33 लाखांची फसवणूक केली. (Pune News) हा प्रकार मे 2020 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बावधन येथे घडली.

अंबरनाथ रामभाऊ झरेकर (वय 71, रा. हडपसर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वृषभ राजेंद्र पवार (वय 27), राजेंद्र दुर्गा पवार (वय 53, दोघे रा. बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Om pratisthan : मुलींच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या ओम प्रतिष्ठानचा माहितीपट प्रदर्शित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यात गुंतवलेले पैसे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून 33 लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले.(Pune News) त्यांना गुंतवलेली रक्कम आणि त्याची दुप्पट रक्कम न देता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.