Chinchwad fraud : डेव्हलपर कडून जागा मालकाची 33 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : विकसनकरार आणि कुलमुखत्यारपत्र करून जागा डेव्हलपिंगसाठी दिलेल्या जागेत ठरल्याप्रमाणे बांधकाम न करता डेव्हलपरकडून जागा मालकाची 33 लाखांची फसवणूक केली.(Chinchwad fraud) ही घटना 11 ऑक्टोबर 2015 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत तालेरानगर, चिंचवडगाव येथे घडली.

रमाकांत गोपाळ आसलकर (वय 73, रा. तालेरानगर, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरके डेव्हलपर्स तर्फे पंकज काशिनाथ पाटील (वय 31, रा. पिंपळे निलख. मूळ रा. नंदुरबार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Durgamata Daud Mulshi : मुळशी तालुक्यात 2000 शिवभक्तांच्या संख्येत निघणार ‘महादौड’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या भागीदारांनी मिळून त्यांची चिंचवड येथील जागा आरोपीला विकसनकरार आणि कुलमुखत्यारपत्र करून बांधकामासाठी दिली.(Chinchwad fraud) आरोपीने ते बांधकाम पूर्ण न करता फिर्यादींना मिळणारे बांधकाम परस्पर विकले. तसेच आर्थिक अडचणींचे कारण सांगून त्यांना रावेत येथील साईटवर फ्लॅट दाखविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 33 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.