Chakan News : खेड मध्ये ३३ नवीन रुग्ण ; २ मृत्यू

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात शुक्रवारी (दि. २३ ) १९ गावे आणि ३ पालिकांमध्ये ३३ रुग्ण मिळून आले आहेत. तर २ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजगुरुनगर पालिका हद्दीतील ५६ वर्षीय पुरुषाचा वायसीएम हॉस्पिटल येथे मृत्यू झाला असून, बहुळ येथील ५६ वर्षीय पुरुषाचा औंध हॉस्पिटल येथे मृत्यू झाल्याचे दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

शुक्रवारी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा ३३ हजार १३२ झाला आहे. यापैकी ३२ हजार ३२६ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. दिवसभरात ४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत ३३२ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी २ मृत्यूने ४७४ एवढा झाला आहे. सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात २६ रुग्ण, चाकण २, आळंदी२, राजगुरुनगर ३ असे एकुण ३३ नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-

बहुळ , चिंबळी,दावडी,डेहने ,ढोरे भांबुरवाडी,कनेरसर, केळगाव,कोये,कुरकुंडी, कुरुळी,मेदनकरवाडी ,पाईट, रेटवडी,संतोष नगर या गावांमध्ये प्रत्येकी १ रुग्ण मिळाला आहे.  कोयाळी ,शिरोली ,वासुली ,महाळुंगे या गावांमध्ये प्रत्येकी २ रुग्ण ; तर शेलपिंपळगाव मध्ये ४ रुग्ण ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.