Chinchwad : पार्क केलेल्या टेम्पोमधून 330 पोती सिमेंट चोरीला

एमपीसी न्यूज – पार्क केलेल्या टेम्पोमधून अज्ञात चोरट्यांनी 330 पोती सिमेंट चोरून नेले. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी सकाळी चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

विश्वनाथ छगन सपकाळ (वय 36, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याबाबत शनिवारी (दि. 17) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या एम एच 14 / जी यु 1123 या टेम्पोमध्ये 330 पोती सिमेंट भरून टेम्पो 1 ऑक्टोबर रोजी रात्री चिंतामणी चौकातील महापालिकेच्या मैदानावर पार्क केला. रात्री अज्ञात चोरट्यांनी टेम्पो चोरून नेला. टेम्पोमधून 1 लाख 17 हजार 876 रुपये किमतीची 330 पोती सिमेंट काढून घेतले आणि टेम्पो मैदानाजवळ आणून पार्क केला. हा प्रकार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.