Nashik News : नाशिक मध्ये 3 हजार 400 कोरोना बाधितांवर उपचार सुरू

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख  ४७८ रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्युज : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त  झालेल्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील 1 लाख 478 कोरोना बाधीतांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या 3 हजार 400 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  आत्तापर्यंत 1 हजार 875  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण 

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक 208, चांदवड 51, सिन्नर 162, दिंडोरी 65, निफाड 139, देवळा 24, नांदगांव 55, येवला 09, त्र्यंबकेश्वर 23, सुरगाणा 01, पेठ 00, कळवण 26,  बागलाण 147,  इगतपुरी 15, मालेगांव ग्रामीण 12 असे एकूण 937 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 2 हजार 280, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 159  तर जिल्ह्याबाहेरील 24 असे एकूण 3 हजार 400  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  1 लाख 5 हजार 753  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे 94.62 टक्के, नाशिक शहरात 95.37  टक्के, मालेगाव मध्ये  92.58 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण92.76 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 95.01 इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण मध्ये 721, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  938, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून 172 व जिल्हा बाहेरील 44  अशा एकूण 1 हजार 875  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

ठळक मुद्दे 

  • 1 लाख 5 हजार 753 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1 लाख  478  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
  • सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  3  हजार 400  पॉझिटिव्ह रुग्ण.
  • जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 95.01 टक्के.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.