Pimpri : बनावट धनादेशाद्वारे बँकेची 35 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बनावट धनादेश बँकेला देऊन त्याआधारे पैसे काढून घेत बँक ऑफ इंडियाची तब्बल 35 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार पिंपरी येथे नुकताच उघडकीस आला.

याप्रकरणी बँक ऑफ इंडिया पिंपरी शाखेचे सहायक महाप्रबंधक लग्नजीत विष्णुभूषण दास (वय-54, रा. बँक ऑफ इंडिया कॅम्पेस, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अर्चना भालचंद्र वाघ (वय-40, रा. मेघसंदेश अपार्टमेंट, नवी सांगवी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्चना वाघ यांनी पिंपरीतील बँक ऑफ इंडिया शाखेत बनावट धनादेश देऊन त्याव्दारे 35 लाख रूपये काढून घेतले. स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरून बँकेची फसवणूक केली. फौजदार कामठे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.