Chakan News : खेड मध्ये 35 नवे कोरोना रुग्ण ; 50 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज :  खेड तालुक्यात शनिवारी  (दि. 4 ) 15 गावे आणि 2 पालिकांमध्ये 35 रुग्ण मिळून आले आहेत. खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34 हजार 564 झाला आहे. यापैकी 33 हजार 705 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.

शनिवारी दिवसभरात 50 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 385 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 574 एवढा झाला आहे.  सायंकाळी पाच पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 27 रुग्ण, चाकण 3, आळंदी 0, राजगुरुनगर 5 असे एकुण 35 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
चास , कडाचीवाडी , कडधे , केळगाव , कोयाळी ,  नाणेकरवाडी , निघोजे , निमगाव , शिरोली  या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला असून ,  वडगाव पाटोळे, ,मरकळ, दोंदे  या गावांमध्ये प्रत्येकी 2 तर  सिद्धेगव्हाण,   बहुळ, कडूस या गावांमध्ये प्रत्येकी 4 रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.