Maval Corona News : मावळात आज कोरोनाचे 35 नवीन रुग्ण; 7 जणांना डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 64 झाली ; 35 new corona patients in Maval today; Discharge to 7 persons

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात  आज, शनिवारी कोरोनाचे 35 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 64 झाली आहे. तर दिवसभरात 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर तळेगाव दाभाडे येथील भंडारा दर्शन कॉलनीत एका 50 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला. 

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 21  रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 14 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये परंदवडी 3, साते 2 , चांदखेड, वराळे, उर्से, धामणे, गहुंजे, आढले बुद्रुक, कान्हे, नवलाख उंब्रे, थोरान येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 10, लोणावळा शहरात 5 आणि वडगावमध्ये 6  रुग्णांची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 64 रुग्णांमध्ये सध्या 402 रुग्ण सक्रीय आहेत. तर 631 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 355 लोणावळा नगरपरिषद 99 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 74 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 536 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या रुग्णालयात 378 आणि होम आयसोलेशनमध्ये 24 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.