Chakan News : राहत्या घरातून तरुण बेपत्ता

एमपीसी न्यूज – ‘बाहेर जाऊन येतो’ असे म्हणून गेलेला तरुण बेपत्ता झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 10) रात्री दहा वाजताच्या सुमारास देशमुखवाडी, चाकण येथे घडली.

अनिल सुरेश भेगडे (वय 35) असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी दहाच्या सुमारास अनिल भेगडे हे घरातून बाहेर जातो असे सांगून निघून गेले ते अद्यापपर्यंत घरी परतलेच नाहीत. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी चाकण पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली आहे.

उंची पाच फूट पाच इंच, रंग सावळा, अंगाने मध्यम, अंगात नेसणीस निळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट, अरमानी फुल पॅन्ट, डाव्या हाताच्या अंगठ्या जवळ इंग्रजी अक्षरात ‘कॅपिटल ए’ असे गोंदलेले आहे. मराठी भाषा बोलतात. वरील वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास चाकण पोलीस स्टेशन 9699608976, पोलीस नाईक वाडेकर 9922043939, नातेवाईक 8805743825, 9860402190, 9881400410, 7744059897, 9594858283, 9819963446, 7507696655 यांच्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.