Pimpri Corona Update : Good News! 3500 पिंपरी-चिंचवडकरांची कोरोनावर यशस्वी मात !

3500 Pimpri-Chinchwadkars successfully defeated Corona रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 57.35  टक्के, अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचे प्रमाण 41.29 तर मृत्यूचा दर 1.38 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली. तरी त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आजपर्यंत 6141 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल 3522 नागरिकांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 57.35 टक्के आहे. तर, वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत 41.29 टक्क्यांवर गेले आहे.  सक्रिय रुग्णांची संख्या 2536 झाली आहे. आजपर्यंत शहरातील 85 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचे प्रमाण 1.38 टक्के आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख वाढत आहे. मागील पाच दिवसात नवीन दोन हजार रुग्णांची नोंद झाली आहे. जुलैअखेरपर्यंत 10 हजार रुग्ण होण्याचा अंदाज आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वर्तविली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णसंख्या वाढत असली. तरी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे ही दिलासादायक बाब मानली जात आहे. 10 मार्चपासून आजपर्यंत शहरातील 6141 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 3522 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 57.35 टक्के आहे. तर, वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचे प्रमाण 41.29  टक्क्यांवर गेले आहे.  सक्रिय रुग्णांची संख्या 2536 झाली आहे. आजपर्यंत शहरातील 85 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचे प्रमाण 1.38 टक्के आहे.

सक्रिय 2536 पैकी केवळ 530 रुग्णांमध्ये लक्षणे

शहरातील विविध रुग्णालयात 2536 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  त्यापैकी 1671 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. तर, 530 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. 54 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.