BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : एटीएम कार्ड चोरून परस्पर 35 हजार काढले; अज्ञातावर गुन्हा

0

एमपीसी न्यूज – बॅगमधून एटीएम कार्ड चोरून खातेदाराच्या परस्पर एटीएममधून 35 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) तोंडे पाटील स्टेडियम, विशाल नगर येथे घडली.

अभिजित मृत्यूंजय कर (वय 33, रा. शिवाजी पार्क, संभाजी नगर, पुणे) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी अभिजित यांची विशाल नगर येथील तोंडे पाटील स्टेडियमवर क्रिकेटची मॅच होती. ते मॅच खेळत असताना त्यांची बॅग त्यांनी बाहेर काढून ठेवली. त्यामध्ये त्यांचे एटीएम कार्ड होते. अज्ञात चोरट्याने अभिजित यांचे एटीएम कार्ड चोरून नेले. त्याद्वारे एटीएममधून 35 हजार रुपये काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3