India Corona Update : देशात 3,51,087 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, रिकव्हरी रेट 97.61 टक्के 

एमपीसी न्यूज – देशात मागील चार दिवसांपासून तीस हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यातुलनेत बरे होणा-या रुग्णांची अधिक असल्याने देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटली आहे. सध्या देशात 3 लाख 51 हजार 087 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रिकव्हरी रेट देखील वाढून 97.61 टक्के एवढा झाला आहे. 

 गेल्या 24 तासांत देशभरात 27 हजार 176 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 33 लाख 16 हजार 755 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 25 लाख 22 हजार 171 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 38 हजार 012 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

मागील 24 तासांत देशभरात 284 कोरोना रुग्ण दगावले असून, भारतात आजवर 4 लाख 43 हजार 497 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 54 कोटी 60 लाख 55 हजार 796 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 16 लाख 10 हजार 829 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 75 कोटी 89 लाख 12 हजार 277 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 61 लाख 15 हजार 690 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.