Pimpri: शहरातील रुग्णसंख्या पाच हजार पार, आज 352 नवीन रुग्णांची भर, 232 जणांना डिस्चार्ज, पाच जणांचा मृत्यू

352 patients today tested positive to coronavirus, 5 covid19 positive patients died today in Pimpri Chinchwad. पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील तब्बल 342 आणि शहराबाहेरील 10 अशा 352 जणांना आज (मंगळवारी) कोरोनाची लागण झाली आहे.

एमपसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या पाच हजार पार झाली  आहे. शहराच्या विविध भागातील तब्बल 342 आणि शहराबाहेरील 10 अशा 352 जणांना आज (मंगळवारी) कोरोनाची लागण झाली आहे.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 232 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.  दरम्यान, आजपर्यंतची रुग्णसंख्या 5203 वर पोहोचली आहे.

आज एकाचदिवशी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी, बौध्दनगर येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिखली, शरदनगर येथील 85, चिंचवड  येथील 84 वर्षीय वृध्द, पिंपरीतील सुखवानीमधील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक तर मिलिंदनगर येथील 75 वर्षीय वृध्द महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आत्तापर्यंत 104 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दररोज रुग्णवाढीचा उच्चांक होत आहे. मागील काही दिवसांपासून 300 हून अधिक रुग्ण सापडत आहे. आज तर शहरातील तब्बल 342 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. महापालिका हद्दीबाहेरील 10 जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर, आज उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 232 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 5203 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 3138 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 72 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 32 अशा 104 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1968  सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल!
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 1360

# पॉझिटीव्ह रुग्ण – 352

#निगेटीव्ह रुग्ण – 1194

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1937

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 2492

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 1270

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 5203

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 1968

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 104

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 3138

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 30278

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 95047

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.